22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्रदेशाने या घटनेची नोंद घेतली

देशाने या घटनेची नोंद घेतली

एकमत ऑनलाईन

मुंबई : नवे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे सर्वांत तरुण अध्यक्ष आहेत, असे म्हणत त्यांनी कौतुक केले आहे. राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाची गौरवशाली परंपरा असून पारदर्शक पद्धतीने आम्ही राज्याचा कारभार चालवणार आहोत. आतापर्यंत अध्यक्षांनी पदाची प्रतिष्ठा जपली आहे, आताही ती जपली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आज मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात पहिलेच भाषण केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विधिमंडळातील पहिली लढाई भाजपने जिंकली आहे. सत्तेतून पायउतार होत आम्ही हे पाऊल उचलले आहे. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांवर टोलेबाजी करत मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे राज्यातले मोठे नेते तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सैनिक होता, मात्र असे असूनही आमचा विजय झाला आहे. सध्या सत्तेतील नेते पायउतार झाले असून या घटनेची देशाने नोंद घेतली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे ते म्हणाले, कोणत्याही आमदारावर जबरदस्ती झालेली नाही. आमदारांना अनेक प्रलोभने दाखवली पण आम्ही ५० जण एकत्र आलो. या आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला. भाजपाने मनाचा मोठेपणा दाखवून मुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात सरकार चालवणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

आम्ही म्हणजेच शिवसेना ;
शिंदेंचा विधानभवनात पुनरुच्चार
राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदन ठरावावेळी बोलताना पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचा गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे.

आज विधानसभेत बोलताना राज्यात भाजप आणि शिवसेनेचे सरकार सत्तेत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह शिवसेनेतील इतर नेत्यांना देखील टोला लगावला आहे. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे देखील आभार मानले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या