24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयदेशाचा कोरोनामुक्तीदर ९७.१८ टक्क्यांवर

देशाचा कोरोनामुक्तीदर ९७.१८ टक्क्यांवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशाचा कोरोनामुक्तीदर गुरुवारी ९७.१८ टक्के नोंदवण्यात आला. कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या एका दिवसात सौम्य वाढ नोंदवण्यात आली. सुमारे ५५ दिवसांनंतर दैनंदिन कोरोनामुक्तांच्या तुलनेत कोरोनाबाधितांचे प्रमाण हे अधिक नोंदवण्यात आले आहे.

गेल्या एका दिवसात ४५ हजार ८९२ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ४४ हजार २९१ रूग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दरम्यान, ८१७ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी २ कोटी ९८ लाख ४३ हजार ८२५ रूग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर, ४ लाख ६० हजार ७०४ रूग्णांवर (१.५०%) उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४ लाख ५ हजार २८ रूग्णांचा (१.३२%) कोरोनाने बळी घेतला.

गेल्या एका दिवसात सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत ७८४ ने वाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील कोरोनाचा आठवड्याचा सरासरी संसर्गदर ५ टक्क्यांहून कमी २.३७ टक्के तर, दैनंदिन संसर्ग दर २.४२टक्के नोंदवण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानूसार गेल्या एका दिवसात केरळमध्ये सर्वाधिक १५ हजार ६०० कोरोनाबाधितांची भर पडली. केरळपाठोपाठ महाराष्ट्र ९,५५८, तामिळनाडू ३,३६७, आंधप्रदेश ३,१६६ तसेच कर्नाटकमध्ये २ हजार ७४३ कोरोनाबाधित आढळले.

ट्विटरने पुन्हा न्यायालयाकडे मागितला वेळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या