24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeदेशाचा रिकव्हरी रेट वाढला, आतापर्यंत 60,490 रुग्ण ठणठणीत होऊन घरी

देशाचा रिकव्हरी रेट वाढला, आतापर्यंत 60,490 रुग्ण ठणठणीत होऊन घरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात आतापर्यंत 1 लाख 45 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, असे असले तरी देशात कोरोनावर मात करून ठणठणीत होणाऱ्या रुग्णांचा टक्काही वाढत आहे. जगातील इतर काही महत्वाच्या देशांच्या तुलनेत भारतात कोरोना बाधितांची संख्या कमी आहे. याच बरोबर मृत्यू दराच्या बबतीतही भारताची स्थिती उत्तम आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत देशात एकूण 60,490 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. रिकव्हरी रेटमध्येही सुधारणा झाली आहे. सध्या भारताचा रिकव्हरी रेट 41.61 टक्के एवढा आहे. एवढेच नाही, तर मृत्यू दरातही कमी झाला आहे. आता देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 3.3 टक्क्यावरून 2.87 टक्क्यांवर आला आहे, असे अग्रवाल म्हणाले.

 भारतात हेच प्रमाण 0.3; मृत्यू दरातही कमी 
जगात प्रति लाख लोकांमागे 4.4 मृत्यू झाले आहेत. तर भारतात हेच प्रमाण 0.3 आहे. जे जगात सर्वात कमी आहे. कोरोनानंतर देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन आणि व्यवस्थापनामुळेच हे शक्य झाले, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

प्रयोगशाळेत व्हायरसचा स्ट्रेन अलग करण्यात आला
कोरोना वॅक्सीनचे किमान 6 महिन्यात मानवावरील परीक्षण सुरू होऊ शकते. रिजनल मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)चे प्रमुख डॉ. रजनी कांत म्हणाले, “पुण्यातील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) प्रयोगशाळेत व्हायरसचा स्ट्रेन अलग करण्यात आला आहे. आता याचा व्हॅक्सीन तयार करण्यासाठी उपयोग होईल. या स्ट्रेनला भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) मध्ये यशस्वीपणे स्थलांतरित करण्यात आले आहे.

Read More  कोरोना उपचारांसाठी मुंबईत जम्बो सुविधांची निर्मिती

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या