23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयहनुमान चालिसा वाचल्याने राजद्रोहाचा गुन्हा ; सर्वाेच्च न्यायालयात उचलला राणा दाम्पत्याचा मुद्दा

हनुमान चालिसा वाचल्याने राजद्रोहाचा गुन्हा ; सर्वाेच्च न्यायालयात उचलला राणा दाम्पत्याचा मुद्दा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयपीसी कलम १२४ अ अन्वये देशद्रोह गुन्ह्याच्या घटनात्म वैधतेला आव्हान देणा-या याचिकांवर आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी नवनीत राणांवर आणि रवी राणांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा न्यायालयात उल्लेख केला. हनुमान चालिसा वाचल्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया, अरुण शौरी, माजी लष्कर अधिकारी आणि महुआ मोइत्रा यांनी देशद्रोह कलमांचा गैरवापर होत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. याच याचिकांवर आज सुनावणी घेण्यात आली. या याचिकांवर उत्तर दाखल करण्यास केंद्राला सांगितले होते. पण, केंद्राने अद्यापही उत्तर दाखल केले नाही. उत्तर दाखल करायला उशीर का? असा सवाल न्यायालयाने एस. जी. तुषार मेहतांना विचारला.

आम्ही दोन कारणांमुळे उत्तर दाखल करू शकलो नाही. आम्हाला योग्य वेळ दिला पाहिजे. प्रतिज्ञापत्राचा मसुदा तयार आहे, सक्षम अधिका-याची मंजुरी अपेक्षित आहे. केंद्राचे उत्तर जवळपास तयार झाले असून दोन-तीन दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल केले जाईल. यामध्ये अन्य याचिकांचाही समावेश करण्यात येणार आहे, असे तुषार मेहता यांनी सांगितले. तसेच केंद्राकडे वेळ वाढवून मागितला. त्यानंतर केंद्राला उत्तर दाखल करण्यासाठी ९ मेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. येत्या १० मे रोजी पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.

एजीने उपस्थित केला नवनीत राणांचा प्रश्न
एजी के. के. वेणुगोपाल यांनी नवनीत राणा यांची बाजू मांडली. हनुमान चालिसा वाचल्याबद्दल राणा दाम्पत्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना कालच जामीन मिळाला. अशा परिस्थितीत न्यायालयाने देशद्रोहाच्या कायद्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची गरज आहे. देशद्रोहावर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची गरज आहे. देशद्रोहात कोणाला परवानगी आहे आणि कोणाला नाही हे ठरवा? याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे तयार करा, असे एजींनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या