23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयपतीला नानाविध त्रास देणेही पत्नीची क्रुरता

पतीला नानाविध त्रास देणेही पत्नीची क्रुरता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जवळजवळ दोन दशकांपासून चाललेल्या एका घटस्फोटाच्या खटल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला. या खटल्यामधील पती पत्नी लग्नानंतर एक दिवसही एकमेकांसोबत राहिले नव्हते. याचसंदर्भात बोलताना न्यायालयाने असे दिसून येत आहे की वैवाहिक जीवानच्या सुरुवातीपासूनच हे नाते संपुष्टात आलेले, असे मत नोंदवले. न्यायालयाने केवळ संविधानातील अनुच्छेद १४२ अंतर्गत आपल्या सर्व निर्णय अधिकारांचा वापर करुन हे लग्न संपवण्यासाठी म्हणजेच घटस्फोटासाठी परवानगी दिली. इतकेच नाही तर न्यायालयीन कारवाईमध्ये विलंब झाल्याचे स्पष्ट करत हिंदू विवाह अनिनियमातील तरतुदीनुसार महिलेने क्रूरता दाखवल्याचे कारण देत घटस्फोटाचा मार्ग मोकळा केला आहे.

सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणा-या पतीने दाखल केलेल्या याचिकेमध्ये माझ्यासोबत लग्न केलेल्या माहिलेला तिच्या सहमतीशिवाय विवाह करण्यास भाग पाडण्यात आले. विवाह करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याने लग्न करण्यात आले. त्यानंतर ती रात्रीच लग्नाच्या हॉलवरुन निघून गेल्याचे म्हटले होते. खंडपीठाने महिलेच्या आचरणासंदर्भात भाष्य करताना याचिकेकर्त्याविरोधात तिने अनेक न्यायालयांमध्ये खटले दाखल केल्याचे लक्षात आले. इतक्यावरच न थांबता या महिलेने पती काम करत असणा-या महाविद्यालयाच्या अधिका-यांनाही त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली होती. म्हणजेच पतीला नोकरीवरुन काढून टाकण्यासंदर्भातील याचिकाही या महिलेने केली होती. यावरच मत व्यक्त करतानाच खंडपीठाने अशाप्रकारे महिलेने वागणे हे क्रूरता केल्यासारखेच असल्याचे मत नोंदवले.

पुरुषाने याचिका दाखल केल्याने झाला उशीर
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्या. ऋषिकेश रॉय यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणामधील जोडप्याचे फेब्रुवारी २००२ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर लगेचच या प्रकरणामध्ये पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र मध्यस्थी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून या दोघांमधील वाद सुटला नाही. याचिकेनंतर याचिका असे करत हे प्रकरण तब्बल १९ वर्ष लांबले. अखेर देशातील सर्वोच्च न्यायसंस्थेने पुरुषाने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना आदेश जारी केला.

महिलेने केल्या होत्या अनेक तक्रारी
या महिलेने कायद्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करत पतीविरोधात तक्रारी दाखल केल्याचे निरिक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने या महिलेची वागणूक ही क्रूरतेने वागणूक देण्यासारखे आहे असे न्यायालयाने म्हणत घटस्फोटोला परवानगी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या