39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeराष्ट्रीयएकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत

एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत

एकमत ऑनलाईन

जशपूर : छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. घराला लागूनच असलेल्या पेरूच्या झाडावर वेगवेगळ्या फांद्यावर हे मृतदेह आढळले. गावक-यांनी मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली.

पोलीस अधिका-यानी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी बगिचा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील,समरबहार डुमरादुमर येथील रहिवासी राजुराम कोरवा, त्यांची पत्नी भिंसारी बाई, चार वर्षांची मुलगी देवंती आणि एक वर्षाचा मुलगा देवन यांचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली.

गावक-यांच्या म्हणण्यानुसार, मृताचे कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होते. काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, एक दिवसापूर्वी मोहा उचलण्यावरून मृताचा गावातील काही लोकांशी वाद झाला होता. मात्र ही घटना एवढी मोठी नव्हती की त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो, असे गावक-यांचे म्हणणे आहे.

सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, तपासानंतरच निष्कर्ष निघू शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

मृत व्यक्तीं विशेष संरक्षित डोंगरी कोरवा आदिवासी समाजाचे आहेत. छत्तीसगडमध्ये अशा सात जमाती आहेत, त्यांची कमी लोकसंख्या आणि विशिष्टता लक्षात घेऊन त्यांना विशेष संरक्षित जमातींच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पहाडी कोरवा या प्रकारात समाविष्ट आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या