मुंबई : वार्षिक जीएसटी रिटर्न भरणाऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी वार्षिक जीएसटी रिटर्न भरण्याची आणि ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची शेवटची तारीख एका महिन्यासाठी 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाने (CBIC) बुधवारी एक ट्वीटमध्ये लिहिले आहे, ‘ आचारसंहिता डोळ्यासमोर ठेवून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाल्यानंतर केंद्र सरकारने वित्तीय वर्ष 2018-19 साठी GSTR-9 आणि GSTR 9C ची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2020 वरून 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मेच्या सुरूवातीला सरकारने 2018-19 या आर्थिक वर्षासाठी जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम तारीख तीन महिन्यांपर्यंत वाढविली. यानंतर 30 सप्टेंबर 2020 डेडलाइन होती.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा