मुंबई : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यंदाचे आयपीएल मैदान चांगलेच गाजवले आहे. गुजरात टायटन्सच्या विजयात मोहम्मद शमीचा सिंहाचा वाटा होता. त्याच्या या खेळासह क्रिकेट जगतात खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहणा-या शमीच्या जीवनात नव्या पार्टनरची एन्ट्री झाली आहे. त्याचा फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमधून शमीला ब्रेक दिला आहे. सध्या मोहम्मद शमी सुटी एन्जॉय करतोय. दरम्यान, नुकतीच त्याने एक बाईक खरेदी केली आहे. त्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आहे.
मोहम्मद शमीने (फङ्म८ं’ एल्ला्री’)ि रॉयल इनफील्ड बाईक खरेदी केली आहे. या गाडीची किंमत तीन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मोहम्मद शमीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बाईकसोबत फोटो पोस्ट केला आहे. क्रशिंग पार्टनर (ू१४्र२्रल्लॅ स्रं१३ल्ली१) असे कॅप्शन शमीने दिले आहे.
मोहम्मद शमीने रॉयल इनफील्डची कॉन्टिनेंटल जीटी ६५० बाईक खरेदी केली आहे.