22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रफडणवीस-शिंदे जोडी महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणेल

फडणवीस-शिंदे जोडी महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणेल

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतली. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या या युतीवर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे. सिंधिया यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती अपवित्र असल्याचेही म्हटले आहे.

सिंधिया पुढे म्हणाले, ‘गेल्या २.५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या विकासात अपवित्र आघाडीमुळे (महाविकास आघाडी) अडथळे येत आहेत. एकनाथ शिंदे मराठा असल्याने एका विचारसरणीच्या बाजूने योग्य निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की, फडणवीस-शिंदे जोडी महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणेल.’

सिंधिया यांनी मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पाडून भाजपला सरकार बनवण्यातही मदत केली होती. ते स्वत: राज्य मंत्रिमंडळाचा भाग बनले नसले तरी त्यांना केंद्रात मोठे मंत्रिपद सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या