अयोध्या :
आम्ही शेतक-यांना कधीही वा-यावर सोडले नाही. आमच्या काळात शेतक-यांना अधिक मदत झाली. तेवढी महाविकास आघाडीच्या काळात कधीही झालेली नाही, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे प्रवक्ते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौ-यावरून आज सकाळी जोरदार टीका केली आहे. राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. बळिराजा संकटात सापडला आहे. असे असताना मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह अयोध्या दौ-यावर गेले आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दीपक केसरकर यांनी अयोध्येतून शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. दीपक केसरकर म्हणाले, साततच्या पावसाने हैराण असलेल्या शेतक-याला मदत करण्याचा निर्णय आमच्याच काळात घेतला. शेतक-यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची योजना आम्ही आणली. भूविकास बँकेचा प्रश्न, तेथील कर्मचा-यांचे प्रश्न आम्ही सोडवले.