39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeक्रीडागुजरात-चेन्नई संघात रंगणार पहिला सामना

गुजरात-चेन्नई संघात रंगणार पहिला सामना

एकमत ऑनलाईन

३१ मार्चपासून आयपीएलचा थरार
मुंबई : आयपीएल २०२३ सुरू होण्यास आता काही दिवसच राहिले आहेत. येत्या ३१ मार्च रोजी आयपीएलचा बिगुल वाजणार आहे. यंदाच्या मोसमातील पहिला सामना गुजरात जाएंटस विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान होणार आहे. उद्घाटनाचा पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएल उद्घाटनाचा रंगारंग कार्यक्रम होणार असून अनेक सेलिब्रेटी थिरकणार आहेत.

कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर जवळपास तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये होम आणि अवे या फॉरमॅटमध्ये स्पर्धा होणार आहे. आयपीएलचा सामना सुरू होण्यापूर्वी नेत्रदीपक सोहळा पार पडणार आहे. या सोहळ््यात हजेरी लावणा-या सेलिब्रेटींच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटिया आयपीएलच्या उद्घाटन सोहळ््यात परफॉर्म करू शकतात. त्याशिवाय, टायगर श्रॉफ, कतरिना कैफ आणि अरिजीत सिंह हे सेलिब्रेटी परफॉर्म करू शकतात.

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२३ चा हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी चेन्नईलाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स गुडघ्याच्या दुखापतीमुळे मोसमाच्या सुरुवातीला गोलंदाजीसाठी तंदुरुस्त असणार नाही. ही माहिती संघाचे प्रशिक्षक मायकेल हसी यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बेन स्टोक्स त्रस्त होता. मात्र दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर इंग्लंडच्या कसोटी संघाच्या कर्णधाराने आपण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सांगितले होते.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या