26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकोरोनाविरोधातील लसीच्या ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा यशस्वी

कोरोनाविरोधातील लसीच्या ह्युमन ट्रायलचा पहिला टप्पा यशस्वी

एकमत ऑनलाईन

लसीतील अँटिबॉडीज कोरोनाव्हारसला निष्क्रिय करत असल्याचं दिसून आलं

वॉशिंग्टन : कोरोनाव्हायरसविरोधात लस कधी येईल याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. जगभरात अनेक देशातील शास्त्रज्ञ लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लसींची चाचणी सुरू झाली आहे. त्यात आता अमेरिकेतल्या एका कंपनीने तयार केलेल्या लसीच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे.

अमेरिकेतल्या मॉडर्ना कंपनीनं (Moderna Inc) तयार केलेल्या mRNA-1273 लसीची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. या लसीतील अँटिबॉडीज कोरोनाव्हारसला निष्क्रिय करत असल्याचं दिसून आलं आहे.

Read More  निलंग्यात 6 कोरोना पॉजिटीव्ह आढळले

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यातील अँटिबॉडीजप्रमाणेच ही लस दिलेल्या सहभागी व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्या. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थनं केलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे. या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींना तीन वेगवेगळे डोस देण्यात आले. या लसीमुळे व्हायरसची लढण्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढत असल्याचं दिसून आलं.

ही लस तयार करण्यासाठी व्हायरसचा वापर केलेला नाही तर कोरोनाचा जेनेटिक कोड तयार केला आहे. ही लस सुरक्षित असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आता पुढील चाचणी जुलैमध्ये केली जाणार आहे.

Read More  रेड झोनमध्ये निर्बंध सैल करणं अशक्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम यांनी लवकरच कोरोनावर लस मिळेल असं सांगितलं होतं. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेला त्यांनी ही माहिती दिली होती. टेड्रॉस यांच्या म्हणण्यानुसार बर्‍याच देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे आणि सुमारे 100 वेगवेगळ्या टीम लसीची चाचणी घेत आहेत आणि त्यातील 8 लसीचा शोध घेण्याच्या अगदी जवळ आले आहेत. सध्या एकूण 7 ते 8 टीम ही लस तयार करण्याच्या अगदी जवळ आहे आणि लवकरच जगाला एक चांगली बातमी मिळेल, असं ते म्हणाले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या