Tuesday, September 26, 2023

नांदेडमध्ये लॉकडाऊनचा पहिला बळी

नांदेड : लॉकडाऊन सतत वाढत गेल्यामुळे एकाएकी पडलेल्या तरुणानी त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन काल मध्यरात्री आत्महत्या केल्याची घटना, आझाद चौक इदगाह रोड वडार गल्ली हदगाव येथे घडली आहे. राजू मारुती बाभुळकर (वय 40) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो वडार समाजातील असून दगड फोडण्याचे काम करीत असे, सतत लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे व हाताला काम नसल्यामुळे त्याच्यावर व त्याच्या मुलीवर उपासमारीची वेळ आली होती.

Read More  रमेश कराड यांची विधान परिषदेवर निवड

त्यामुळे, परिसरात राहणाऱ्या परिचयाच्या कुटुंबाकडून त्याला व त्याच्या मुलीला जेवण दिले जात होते. त्यानंतर लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे तो एकाकी पडला होता. तसेच त्यांची दोन मुले व पत्नी कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. परंतु, ते सुद्धा लोकडाऊन लागल्यामुळे त्यांच्या सुद्धा हाताला काम नव्हते त्यामुळे दोन दिवसापूर्वीच पायी चालत हदगाव येथे आली व त्यांना समाज कल्याण होस्टेल हदगाव येथे कोरनटाईन केले आहे.

राजू बाभुळकर सतत निराश राहत होता. आता पत्नी व मुले सुद्धा आली तो एकांतात रडत बसायचा आता तर आपली पत्नी व दोन मुले येथे आली असल्याचे त्यांना समजले, व आपण आता त्यांना काय खाऊ घालणार तर लॉकडाऊन अजून किती वाढेल त्याचीही खात्री नाही यामुळे या नैराश्यातून त्यांनी आपली जीवन यात्रा काल मध्यरात्री संपविली.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या