26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeफॉक्सकॉन प्रकल्पाबाबत केवळ चर्चा, लेखी व्यवहार झालेच नाहीत

फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत केवळ चर्चा, लेखी व्यवहार झालेच नाहीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत कालपासून संभ्रम निर्माण केला जात आहे. या प्रकल्पाबाबत कोणताही सामंजस्य करार झाला नव्हता. केवळ चर्चा झाली होती असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. सामंत हे एका कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी त्यांनी सध्या विरोधक करत असलेले दावे फेटाळून लावले. दरम्यान, संलग्न प्रकल्प महाराष्ट्रात आणू अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचेही सामंत यावेळी म्हणाले.

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यावरून राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचे खापर महाविकास आघाडीवर फोडले आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारकडे बोट दाखवले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या