24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसोलापूरपितापूर येथे अंत्ययात्रा काढली थेट हरणा नदीतून

पितापूर येथे अंत्ययात्रा काढली थेट हरणा नदीतून

एकमत ऑनलाईन

अक्कलकोट : पितापूरच्या गावक-यांना हरणा नदीचा धोका जाणवत होता म्हणून येथील नागरिकांनी हरणा नदीला पूल व्हावा म्हणून अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली होती. प्रशासनानी त्याची दखलच घेतली नाही, त्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आज त्या प्रेताची अंत्ययात्रा थेट पाण्यातूनच निघाली, ‘काय नशिबी’त्या प्रेताची.

नदीला पूल नसल्याने ती अंत्ययात्रा सुखात निघण्या ऐवजी दु:खात निघाली. अक्कलकोट तालुक्यातील पितापूर येथे दु:खद निधनाची घटना घडली. त्याची अंत्ययात्रा गावापासून स्मशानभूम पर्यंत निघणार होती. परंतु हरणा नदीला पुर आल्याने मोठी अडचणी निर्माण झाली. ग्रामस्थांना पर्यायी रस्ताच नसल्याने पुराच्या पाण्यातून अंतयात्रा काढण्याची वेळ आली, नागरिकांनी पाण्यात रिकामे बॅरल ठेवून त्यावर प्रेत ठेवले, त्याला मागे व पुढे लोकांनी पकडून नदी पार केले आणि तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. हरणा नदीतून काढण्यात आलेली अंत्ययात्राचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

पितापूरच्या नागरिकांनी हरणा नदीचा पुल व्हावा म्हणून प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती. प्रशासनानी या विषयाकडे दुर्लक्ष केले. आता तरी प्रशासन शहाणे होणार का? यापुठे असा वाईट प्रसंग येऊ नये म्हणुन हरणा नदीला पूल बांधणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.हा विषय प्रशासनानी गांभीर्याने घ्यावा ही काळाची गरज आहे. प्रशासन गांभीर्याने घेणार किंवा नाही, हा येणारा काळच ठरवेल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या