आयसीसी : ६ जूनपासून डार्विन व डिस्ट्रिक्ट क्रिकेटच्या टी-२० स्पर्धा सुरू
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉन्सिलची (आयसीसी) २८ मे रोजी बैठक होणार आहे. व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे होणाºया बैठकीत ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणा-या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर चर्चा होईल. कोरोना व्हायरसमुळे आयोजनावर अद्याप शंका आहे. जर विश्वचषक पुढे ढकलला तर त्याचे आयोजन २०२२ मध्ये होऊ शकते. कारण २०२१ मध्येदेखील टी-२० विश्वचषक होत असून त्याचे यजमानपद भारताला मिळाले आहे. एकूणच या स्पर्धेच्या आयोजनाबाबत अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. स्थगितीमुळे ही स्पर्धा दोन वर्षांनंतरच आयोजित केली जाणार असल्याचीही चर्चा आहे. आयसीसीच्या बैठकीत खेळाच्या नियमावरदेखील चर्चा होऊ शकते. यात चेंडूवर लाळ व घाम लावणे याचा समावेश असेल. यादरम्यान मंडळाच्या एका अधिकाºयाने म्हटले की, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया विश्वचषक पुढे ढकलल्याने नाराज होणार नाही.
Read More उद्योग क्षेत्रातील नव्या संधीचा मराठी तरुणांनी फायदा घ्यावा
आयसीसीला आपल्या सर्व सदस्य देशांचे म्हणणे ऐकावे लागेल. जर कोणता देश द्विपक्षीय मालिकेला महत्त्व देत असेल तर त्याला कमी केले जाऊ शकत नाही.’ विश्वचषकानंतर डिसेंबर-जानेवारीत भारत ऑस्ट्रेलिया दौ-यावर जाणार असून येथे संघ चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचे आजी-माजी खेळाडू कसोटी मालिका कोणत्याही परिस्थितीत खेळवण्याच्या बाजूने आहेत. मालिका न झाल्यास ऑस्ट्रेलियाचे मोठे नुकसान होऊ शकते. अधिका-याने म्हटले की, मालिका स्थगित केल्याने आयसीसीचे नुकसान होणार नाही, त्याच्या आयोजनाने सूट मिळू शकते. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचा कार्यकाळ दोन महिन्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.
रिकाम्या स्टेडियममध्ये खेळणे शक्य : अँडरसन
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने म्हटले की, तो खेळण्यासाठी पुन्हा उत्साहित आहे. सामना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवला जाईल. इंग्लंडमध्ये पुढील आठवड्यापासून वैयक्तिक सराव सुरू होत आहे. इंग्लंडला जुलैमध्ये घरच्या मैदानावर विंडीज व पाकिस्तानविरुद्ध सहा कसोटी खेळायच्या आहेत. अँडरसनने म्हटले, ‘आम्ही उन्हाळ्यात क्रिकेट खेळण्याच्या बाबतीत विचार करत आहोत. हे खूप उत्साही असेल. सुरक्षेबाबत बोलायचे झाले तर आम्हाला विनाप्रेक्षक खेळायला अडचण नाही.
आयपीएलसाठी वेळ
विश्वचषकाचे आयोजन जर २०२२ पर्यंत स्थगित केले तर आयपीएलच्या आयोजनासाठी वेळ मिळू शकतो. टी-२० लीगला कोरोनामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. लीगचे आयोजन न झाल्यास बीसीसीआयला जवळपास ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
६ जूनपासून रंगणार सामने
यंदाचा आयसीसी क्रिकेट टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. आता याच ऑस्ट्रेलियात स्पर्धात्मक क्रिकेटला आता सुरुवात होणार आहे. ६ जूनपासून डार्विन व डिस्ट्रिक्ट क्रिकेटच्या टी-२० स्पर्धा सुरू होत आहेत. यावेळी खेळाडूंना घाम किंवा लाळ खेळताना चेंडूवर वापरता येणार नाही. यावेळी चेंडूला चकाकी मिळण्यासाठी वॅक्स अप्लिकेटर वापरता येईल का याचाही विचार डार्विन व डिस्ट्रिक्ट क्रिकेटचे व्यवस्थापन करत आहे. हे करताना पंचांचा काय उपयोग होईल यावरही ते सखोल विचार करत
आहेत.
संपूर्ण कसोटी मालिका अॅडलेडवर!
नियोजित क्रिकेट कार्यक्रम पत्रिकेनुसार डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौ-यावर चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार होता. कोरोनाच्या साथीमुळे हा दौरा रद्द झाल्यास ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संघटनेचे दूरचित्रवाणी प्रक्षेपणाद्वारे मिळणा-या ३० कोटी डॉलर्सचे नुकसान होईल. भारताविरुद्धची संपूर्ण कसोटी मालिका अॅडलेड ओव्हल येथे रिकाम्या स्टेडियमवर खेळवण्यात यावी. या परिसरात एका नव्या हॉटेलची बांधणी केली जात आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी ते अधिक सुरक्षित ठरेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा कसोटी उपकर्णधार ट्रॅव्हिस हेडने गुरुवारी व्यक्त केले होते. ‘बीसीसीआय’चे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनीही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचे संकेत दिले आहेत. ‘परिस्थितीमुळे सर्व सामने एकाच मैदानावर खेळावे लागतील. ऑस्ट्रेलियातील टाळेबंदी उठल्यानंतर तेथील नवे धोरण स्पष्ट होऊ शकेल. परंतु सामने प्रेक्षकांविना होण्याची दाट शक्यता आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले.
ऑस्ट्रेलियासमोर आर्थिक संकट
वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र ३० सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियन सरकारने लॉकडाऊन घोषित केलेले असल्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल २८ मे रोजी आयसीसी बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड आर्थिक संकटात आहे. त्यात वर्षाअखेरीस भारताचा प्रस्तावित दौरा रद्द झाल्यास ऑस्ट्रेलियासमोरचे आर्थिक संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.