25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रकोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडणार

कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडणार

एकमत ऑनलाईन

सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे ११६ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणाचा एकूण पाणीसाठा १०१.५७ टीएमसी झाला असून जलाशयात प्रति सेकंद ८५७३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी असून पडत असलेला पाऊस आणि धरणात होणारी पाण्याची आवक याचा विचार करून धरण व्यवस्थापनाने आज दुपारी दोन वाजता दुस-या वेळी धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उचलून पाणी नदीपात्रात सोडण्याचे जाहीर केले आहे.

दरवाजे दीड फुटाने उचलले तर सहा वक्र दरवाजांतून १२८९१ क्युसेक्स आणि पायथा वीज गृहातून १०५० क्युसेक्स असा एकूण १३९४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येणार आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या