25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रअजित पवार यांच्या सूचनेने तरुणीने केली पूजा

अजित पवार यांच्या सूचनेने तरुणीने केली पूजा

एकमत ऑनलाईन

बारामती : विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या अनोख्या शैलीमुळे किंवा स्पष्टवक्त्या स्वभावामुळे चर्चेत असतात. आज अजित पवार बारामतीच्या दौ-यावर आहेत. यावेळी अजित पवारांनी एका तरुणीला पूजा करण्यास सांगितले. संकोच बाळगणा-या तरुणीला ‘मी सांगतो ना पूजा कर’ असे अजितदादा म्हणाले आणि ती तयार झाली.

अजित पवार यांचे आज बारामतीत भरगच्च कार्यक्रम आहेत. त्यातच बारामतीमधील एका वुडन फ्लोअरिंगच्या कार्यक्रमाला अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात अजित पवार यांच्या हस्ते पूजा करण्याचे आयोजकांचे म्हणणे होते. मात्र अजित पवार यांनी तिथे असणा-या एका तरुणीला सूचना केली, ‘तू पूजा कर…. मी सांगतो ना’ अशा शब्दांत त्यांनी त्या तरुणीला पूजा करण्यास सांगितले.

आता थोडंसं पाणी घे, अशा काही सूचनाही अजितदादा मध्ये-मध्ये करत होते. तिने नारळ वाढवताच सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तर अजितदादांनी फुलं एकापुढे एक रचून ठेवली. पूजा झाल्यानंतर त्या तरुणीने पूजा करून अजित पवार यांचे आशीर्वाद देखील घेतले. तर ‘ऑल द बेस्ट’ म्हणत अजितदादांनी शुभेच्छा दिल्या.

अजित पवार हे अनेकदा आपल्या दौ-यात वेगवेगळ्या गोष्टी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातच हा बारामतीचा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या