25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रसरकार कुठेतरी कमी पडले; पुनर्याचिका दाखल करावी

सरकार कुठेतरी कमी पडले; पुनर्याचिका दाखल करावी

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या आदेशापूर्वी ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्या ओबीसी आरक्षणाविनाच होतील, असा आदेश आज सुप्रीम कोर्टाने दिला असून ही बाब मांडण्यासाठी सरकार कुठेतरी कमी पडले आहे त्यामुळे सरकारने पुनर्याचिका दाखल करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजप आणि राज्य सरकारवर मिश्किल टीका केली आहे.

दरम्यान, आज कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांसंदर्भात दिलेल्या आदेशानंतर ३६५ जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. त्यामुळे ९२ नगर परिषदांतील ओबीसी उमेदवारांना याचा फटका बसणार आहे. यानंतर केंद्रातील भाजप सरकारला लोकशाहीची थट्टा करायची आहे, याचे नेते फोडा, त्याचे फोडा असे राजकारण सध्या राज्यात आणि देशात चालू असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेच्या आधारावर नेत्यांवर दबाव टाकणे आणि नवी सत्ता स्थापन करणे हे राजकारण चालू असून राज्यात दोनच लोकांचे अपंग सरकार आहे. गेल्या एक महिन्यापासून दोन लोकांचे अपंग मंत्रिमंडळ काम करत आहे हे कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाही, कमीतकमी बारा मंत्री असणे आवश्यक असते पण दोनच लोक निर्णय घेत आहेत, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

कुठे ना कुठे डाळीत काळे आहे, ते दिल्ली वारी का करतात? मंत्रिमंडळाचा विस्तार का थांबला आहे? महाविकास आघाडी सरकार पडले तेव्हापासून ते दिल्लीत मुक्कामी आहेत. महाराष्ट्रातील सरकारची अशा प्रकारची अपंग अवस्था निर्माण करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या