25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रमविआ सरकारने औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे केले ; नितेश राणेंचा गंभीर आरोप

मविआ सरकारने औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे केले ; नितेश राणेंचा गंभीर आरोप

एकमत ऑनलाईन

अमरावती : सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचे वाटोळे करून आता उलटा कांगावा सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

‘टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे भाजपचे नेते आणि शिवसेनेमध्ये वाद पेटला आहे. याच मुद्यावरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत अभियान संपूर्ण देशात राबवले गेले. विमान निर्मितीच्या या प्रकल्पासाठी ८ सप्टेंबर २०२१ रोजी एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच २४ सप्टेंबर २०२१ रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. एअरबस आणि टाटा यांच्यातील करारानुसार संयुक्तपणे उभारण्यात येणा-या या प्रकल्पास संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्याचे रतन टाटा यांनी त्याच दिवशी जाहीरही केले होते, असा दावाच नितेश राणे यांनी केला.

हे सगळं झालं असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठवले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. या वस्तुस्थितीची माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करू नये, मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबतही ठाकरे सरकारने असाच बेजबाबदारपणा दाखवून तो प्रकल्प घालविला. या प्रकल्पातूनही वाटाघाटीद्वारे वसुलीचा छुपा हेतू तर नव्हता ना, अशी शंकाही राणे यांनी व्यक्त केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या