19 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यपालांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या

राज्यपालांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यपाल या पदावर बसणा-या व्यक्तीने जबाबदारीने बोलणे गरजेचे असते. सध्याच्या राज्यपालांनी अनेकवेळा अशी वक्तव्ये केली त्यावेळी आम्ही त्या पदाची गरिमा राखण्यासाठी काही बोललो नव्हतो. मात्र, आता शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत आता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घ्यायला हवी, असेही पवार यांनी म्हटले.

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात राज्यपालांनी आपल्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले होते. शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक असून नवीन काळात गडकरी हे नायक असल्याचे म्हटले होते. राज्यपालांच्या वक्तव्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. विरोधकांनी राज्यपालांवर टीका करताना केंद्र सरकारने त्यांना माघारी बोलावावे अशी मागणी केली आहे.

शरद पवार यांनी म्हटले की, आतापर्यंत राज्यपालांनी विविध वक्तव्ये केली होती. एक मर्यादा म्हणून त्यावर भाष्य केले नव्हते. आता, मात्र राज्यपालांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दखल घ्यावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले आणि काही गावं आम्हाला हवीत असे ते बोलले. बेळगाव, निपाणी, कारवार ते सोडणार असतील तर त्यांना काय द्यायचं याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र, महाराष्ट्राचा भाग पुन्हा द्यायचा नाही. त्यांनी वरून दुसरी मागणी करायची याला काही अर्थ नाही. त्यांच्या मागणीला आमचा विरोध असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या