32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeमहाराष्ट्रकंगना वादात आता राज्यपालांची उडी

कंगना वादात आता राज्यपालांची उडी

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत प्रकरणी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना राजभवनवर बोलवून घेतलं. राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याशी कंगना रानौत हिच्या घरावर झालेली कारवाई आणि या प्रकरणी सरकारची भूमिका याबाबत झाली चर्चा केली.

कंगनाने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊतांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला. यावर कंगनाने ट्विट करत आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं म्हटलं. या वादानंतर कंगनाला केंद्र सरकारकडून Y सुरक्षा देण्यात आली.

मुंबई महानगपालिकेने कंगनाचं कार्यालय अनधिकृत असल्याचं म्हणत त्यावर कारवाई केली. कंगनाने मुंबईत नसताना तिच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईमुळे कंगनाचे वकील उच्च न्यायालयात गेले तेथे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला.

लातूरकरांची चिंता वाढली : जिल्ह्यात तब्बल ५०२ रुग्ण वाढले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या