मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याने राज्यभरात मोठा गदारोळ माजला आहे.
यासंदर्भात आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी ट्विट करत राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
यात ते म्हणतात, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. त्यांना राज्यपालपदावरून तत्काळ हटवावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.