21.9 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यपालांना आज रुग्णालयातून सुटी

राज्यपालांना आज रुग्णालयातून सुटी

एकमत ऑनलाईन

मुंबई: राज्यात एकनाथ शिंदेंनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार घेऊन ऐतिहासिक बंड पुकारले. राज्यात सत्ताबदलाची चिन्हं दिसू लागली. मात्र या सगळ्या गोंधळादरम्यानच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली. यामुळे सत्तास्थापनेसाठी तसेच अनेक महत्त्वाच्या राजकीय हालचालींवर मर्यादा आली.

मात्र आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हं दिसत आहेत. दरम्यान, या सगळ्या गोंधळामध्ये भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवा-यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती हाती येत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या