23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यपालांचे वक्तव्य म्हणजे अतिशयोक्ती अलंकार

राज्यपालांचे वक्तव्य म्हणजे अतिशयोक्ती अलंकार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यपाल भगतंिसग कोश्यारी यांच्या वक्तव्याने राज्यभरात मोठा गदारोळ माजला आहे. विविध क्षेत्रांतून त्यांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले, तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान कोश्यारी यांनी केले होते. या विधानाशी आपण सहमत नसल्याची भूमिका भाजपाने घेतलेली दिसून येते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावर आता स्पष्टीकरण दिलं आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपण कोश्यारींच्या विधानाशी सहमत नसल्याचं सांगितलं आहे. तसंच राज्यपालांचे विधान म्हणजे अतिशयोक्ती अलंकार असंही ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं कार्य, त्याचे श्रेय हे सर्वाधिक आहे.

उद्योग क्षेत्रामध्ये मराठी माणसाने जी प्रगती केली, त्यामुळे त्याचं जगभरात नाव झाले आहे. विविध समाजांचं योगदान नाकारता येणार नाही. पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणूस, मराठी उद्योजक, मराठी साहित्यिक यांचा सहभाग सर्वाधिक आहे.

राज्यपालांचे विधान अतिशयोक्ती अलंकार असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले की, एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात ब-याचदा अतिशयोक्ती अलंकार वापरला जातो. त्याप्रमाणे राज्यपाल बोलले असतील. पण आम्ही त्यांच्या त्या विधानाशी सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासात जडणघडणीत मराठी माणसाचा सहभाग मोठा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या