21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रबाळासाहेबांनी शिवतीर्थावर लावले गुलमोहराचे झाड कोसळले

बाळासाहेबांनी शिवतीर्थावर लावले गुलमोहराचे झाड कोसळले

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्ष आजवरची सर्वांत मोठी आव्हानात्मक लढाई लढत असतानाच बाळासाहेब ठाकरे यांच्याशी नाते सांगणारे दादरच्या शिवाजी पार्कमधील एक अतिशय जुने, मोठे गुलमोहराचे झाड कोसळले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी हे गुलमोहराचे झाड जवळपास तीस ते चाळीस वर्षांपूर्वी लावले होते. शिवाजी पार्कमधले हे अतिशय जुने झाड होते. हे झाड कोसळल्याने बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे.

मुंबईमध्ये पावसाने धुमशान घातले आहे. पुढील दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्री हे गुलमोहराचा झाल उन्मळून पडले. मुसळधार पावसामुळे रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हे झाड कोसळले असल्याची माहिती समोर आली . घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर स्मृतीस्थळावर पाहणी करता दाखल झाल्या आहेत. पालिकेचे कर्मचारी स्मृतीस्थळावर दाखल झाले आहे. कोसळले झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे बाळासाहेबांनी रक्ताचे पाणी करून शिवसेना सारखे वटवृक्ष उभे केले. आज त्याच शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. ५० पेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला असून भाजपसोबत सरकारही स्थापन केले आहे. बंडखोर गटाकडून आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्नच उपस्थितीत झाला आहे. अशातच बाळासाहेबांनी लावलेले गुलमोहराचे झाड उन्मळून पडल्याची घटना समोर आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या