26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयपुढील पाच दिवसात उष्णतेची लाट तीव्र

पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट तीव्र

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट तीव्र होणार असून काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागामध्ये ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर-पश्चिम भागात आगामी दिवसांमध्ये तापमानात दोन डीग्री सेल्सियसची वाढ होण्याचा अंदाज आहे.
देशात पश्चिम-उत्तर भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र कमी झाले असून, आता पुन्हा कोरडे व उष्ण वारे राजस्थान व गुजरातकडून पुन्हा सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे आगामी चार-पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
हवामान विभागाने याबाबत माहिती देताना सांगितले की, पुढील दोन दिवस उत्तर-पश्चिम देशातला बहुतांश भागातील तापमानात वाढ होईल. उन्हाचा तडाखा वाढणार असून तापमान दोन डीग्री सेल्सियसपर्यंत वर जाण्याची शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भाला याची अधिक चटके लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, झारखंड, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि मध्य प्रदेशमध्ये कमाल तापमानामध्ये ३.१ ते ५ अंशांपर्यंत वाढ झाली आहे. मध्य प्रदेशमधील राजगड येथील पारा ४५.६ डीग्रीवर पोहोचला असून आगामी काळामध्ये हा पारा ४७ डीग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
हवामाना विभागाच्या मते यंदाचा एप्रिल महिन्या विक्रमी तापमानाचा ठरणार आहे.

तसेच मे महिन्यातही उन्हाच्या झळा जाणवणार असून लहान मुले, वृद्ध आणि जुन्या आजारांनी त्रस्त असणा-यांना याचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी दुपारच्या वेळी बाहेर जाण्याचे टाळावे आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावेत असे आवाहन हवामान विभागाचे तज्ज्ञ नवदीप दहिया यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या