Saturday, September 23, 2023

पुण्यात आज दिवसभरात सर्वाधिक ३९९ कोरोना पॉजिटीव्ह तर १० जणांचा मृत्यू

पुणे : पुणे शहरात आज सर्वाधिक ३९९ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले.आजपर्यँतचा हा सर्वाधिक आकडा आहे.कोरोना बाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे.प्रशासनापुढेही कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.आज दिवसभरात ३९९ कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले तसेच आज १०० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.

Read More  लॉकडाउन वाढवणं आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरेल- आनंद महिंद्रा

१७९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील ४४ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.उपचार घेत असलेले १७५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.पुण्यात एकूण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या ५ हजार १८१ झाली असून ऍक्टिव्ह रुग्ण संख्या २ हजार १८२ आहे.डॉ.नायडू हॉस्पिटल आणि काही खासगी हॉस्पिटलमध्ये ४ हजार ७३५ तर ससून हॉस्पिटलमध्ये ४४६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.आज ६८९ जणांच्या नमुन्यांची(स्वॅब)ची तपासणी करण्यात आली.कोरोनामुळे आजपर्यंत २६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजपर्यँत २ हजार ७३५ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या