दिलासादायक : १३१७ रूग्ण बरे
औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बधितांची संख्या वाढत चालली असून,आज मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रेकॉर्ड मोडला असून गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार १३२ रूग्ण आढळले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा असल्याने औरंगाबादमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, शनिवारी आलेल्या १३२ बधितांच्या अहवालानंतर औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या २४०७ झाली आहे.
९६९ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार
औरंगाबादेत एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच, त्यातच दिलासा देणारी बातमी म्हणजे अनेक रुग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत १३१७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र आतापर्यंत १२१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून,९६९ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या रुग्णांमध्ये जयसिंगपुरा, बेगमपुरा (1), मिसरवाडी (1), सुभेदारी विश्रामगृहा जवळ (1), उस्मानपुरा (2), एन आठ (1), जुना बाजार (1), आकाशवाणी परिसर (1), उल्कानगरी (1), संजय नगर (1), एन दोन सिडको (1), गणेश कॉलनी (1), बुड्डीलेन (1), बायजीपुरा (1), बंजारा कॉलनी (1), हेडगेवार रुग्णालय परिसर (1), एमजीएम रुग्णालय परिसर (1), शिवाजी नगर (5), उत्तम नगर (3), कैलास नगर (7), गादिया विहार (1), सहकार नगर (1), नक्षत्रवाडी (1), चेलीपुरा (1), टी.व्ही सेंटर, पोलिस कॉलनी (1), संजय नगर, बायजीपुरा (1), एन सात सिडको (1), न्यायनगर (2), हुसेन कॉलनी (1), संजय नगर, मुकुंदवाडी (1), सातारा परिसर (1), साईनगर, एन सहा (2), एन आठ सिडको, गजराज नगर (1), पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा (1), हरिप्रसाद अपार्टमेंट (1), दशमेश नगर (1), पद्मपुरा (2), गांधी नगर (3),सिल्कमिल कॉलनी (1),विशाल नगर (3), बेगमपुरा (2), गोविंद नगर (1), समता नगर (1), फाजीलपुरा (4), न्यू हनुमान नगर (5), सिडको एन आठ (12), गौतम नगर, घाटी परिसर (2), रशीदपुरा (1), मयूर पार्क म्हसोबा नगर (1), भवानी नगर (2), भारतमाता नगर (३), विजय नगर (१), गारखेडा, गजानन नगर (1), कोहिनूर कॉलनी (1), जिल्हा परिषद परिसर (1), हर्सुल सावंगी (1), सिव्हील हॉस्पीटल परिसर (3), टी व्ही सेंटर (1), बिस्मिला कॉलनी (3), सिडको वाळूज महानगर एक (2), एकता नगर, हर्सुल परिसर (1), बजाज नगर (७), साई नगर, पंढरपूर (3), जुनी मुकुंदवाडी (7), नारेगाव (1), गंगापूर (1), नायगाव (1), सिल्लोड (1), उपसंचालक आरोग्य कार्यालय परिसर (1), अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 57 महिला आणि 75 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
Read More त्रिपुरात झाली पहिल्या मृत्यूची नोंद