24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeचक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता

चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबरोबर आता निसर्ग चक्रीवादळाचे संकट उभे राहिले आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट जारी करण्यात आले असून मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. हे वादळ आज (३ जून) अलिबागला धडकण्याची शक्यता आहे. तासागणिक निसर्ग चक्रीवादळ पुढे सरकते आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून १४० किलोमीटर अंतरावर तर मुंबईपासून १९० किलोमीटर अंतरावर, चक्रीवादळ दुपारी तीन ऐवजी एक वाजेपर्यंत धडकण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्याच्या किनारपट्टीवर आज निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्यामुळे एनडीआरएफसह नौदलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निसर्ग चक्रीवादळ भीषण स्वरुप धारण करण्याची दाट शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत काल (२ जून) फोनवरून संवाद साधला आहे.

Read More  निसर्ग परीक्षा घेतोय, ताकदीने सामना करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

निसर्ग चक्रीवादळ रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मोठे नुकसान करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागही या वादळाच्या पट्ट्यात येईल, असा अंदाज आहे. गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसेच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्गचा फटका बसू शकतो. या संपूर्ण भागांसाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई किनाऱ्यावर ‘निसर्ग’ धडकणार

प्रचंड वेगानं समुद्रातून पुढे सरकणारं हे वादळ बुधवारी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या सुमारास अलिबाग आणि मुंबईत धडकणार आहे. सध्याच्या घडीला हाती आलेल्या माहितीनुसार ‘निसर्ग’ अलिबागपासून, ११५ किलोमीटर अंतरावर आहे. तर, मुंबईपासून हे वादळ साधरण १६५ किमी अंतरावर आहे. त्यामुळं वादळ आणि त्यासोबत घोंगावणारं संकट हे अगदी जवळ आल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या