कोरोनासोबत देशापुढे एक नवं संकट उभं ठाकलय. ‘अम्फान’ नावाचं चक्रीवादळ येत्या 12 तासांत भारताच्या काही भागात धडकणार आहे. दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे येत्या 12 तासांत पश्चिम बंगाल, ओडिशाच्या काही जिल्ह्यांमध्ये अम्फान चक्रीवादळ धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या भागात राहणा-या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Read More धक्कादायक …उदगीर शहरात आज १० नवीन रुग्ण
चक्रीवादळामुळे निर्माण होणा-या आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व उपाययोजना सुरु असून या भागातील सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत अग्निशमन, NDRF, स्थानिक पोलीस सर्वांना सूचना दिल्या आहेत. तसेच येथील नागरिकांना देखील योग्य ती खबरदारी घेण्यास सांगितली आहे.
या चक्रीवादळामुळे दिल्ली, एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्किम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, केरळ, कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, उत्तर ओडिशा, अंदमान आणि निकोबार, जम्मू-काश्मीर, लडाख , राजस्थान, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Read More इंदापूर तालुक्याला अवकाळीचा तडाखा
१८ मेपासून आंध्र किनारपट्टी आणि ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धोका आहे. त्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नका, असा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे.