Tuesday, September 26, 2023

अनैतिक संबंध ठेवले म्हणून पतीनेच काढला पत्नीसह दोन मुलांचा काटा

बीड: बीड शहरातील शुक्रवार पेठमध्ये तकवा भागात चारित्र्याच्या संशयावरून अन पत्नीच्या अनैतिक संबंधावरून पतीने पत्नीचा व दोन मुलाचा मुलांचा खून केला. या घटनेत सर्वात मोठा मुलगा आत्याकडे गेलेला असल्याने त्याचा जीव वाचला. संतोष कोकणे असे आरोपीचे नाव आहे. तर पत्नी संगीता संतोष कोकणे (31), कल्पेश कोकणे ( 10), सिद्धेश कोकणे (वय 8, सर्व रा. बीड) असे खून झालेल्या तिघा मायलेकरांची नावे आहेत. या घटनेमुळे बीड शहर परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासात पतीनेच पत्नीचा आणि दोन मुलांचा खून करून संबंधित पोलिस स्टेशन गाठले आणि पत्नी गायब झाली असल्याची तक्रार दिली. काहीच वेळात आरोपीच्या पत्नीचा आणि दोन मुलांचा मृतदेह घरात आढळून आला. प्रकरणानंतर आरोपी ताब्यात घेऊन चौकशी करेपर्यंत पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे उपविभागीय पोलिस अधिकारी सावंत हे पेठ बीड पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते.

Read More  बीड : आज आणखी 6 रुग्ण वाढले

संतोष हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. एवढेच नाही तर 17 मे रोजी संतोष याने पेठ बीड पोलीस ठाण्यात पत्नी गायब झाल्याची तक्रार देखील दिली होती. संतोष कोकणे रविवारच्या दिवशी बहिणीकडे झोपायला गेला. पहाटे उठून आपल्या घरी गेला चारच्या दरम्यान पत्नी व दोन मुलांना झोपेतच मारून टाकले. पत्नीच्या डोक्यात बॅट घालून मारत असताना अचानक दोन नंबरचा मुलगा कल्पेश जागा झाला. पत्नीच्या डोक्यात बॅट घालताना मुलाने पाहिले म्हणून कल्पेशच्या देखील डोक्यात बॅटने वार करत त्याला जागीच ठार केले. दुसरा मुलगा सिद्वेष यास पाण्यात बुडवून ठार केले अन पुन्हा बहिणीकडे झोपायला गेला.

याप्रकरणीसंतोष कोकणे याच्याविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. काही तासातच संतोष कोकणे याने पोलिसांची जवळ गुन्हा कबुल केला असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या