22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रभाजपची वैचारिक पातळी खाली गेलीय

भाजपची वैचारिक पातळी खाली गेलीय

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राज्यातले प्रकल्प बाहेर जातायत, असे म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर टीका केली. वैचारिक पातळी खाली गेली असून भ्रष्टाचाराचे आरोप करणा-यांकडे काहीच उरलेले नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. थ्री जी, टू जीचे आरोप ज्यांच्यावर भाजपने केले, त्यातील आरोपी असलेले लोक आता केंद्रातील भाजप सरकारमध्ये खासदार आहेत, असे म्हणत अरविंद सावंत यांनी भाजपला आरसा दाखवला.

एक भ्रम भाजपकडून निर्माण केला जातो, त्या भ्रमाचा आम्हालाही फटका बसला, असे त्यांनी यावेळी बोलताना मान्य केले. चौकशी करायचीच असेल, तर राफेलची चौकशी करा, असेही ते म्हणाले. ज्यांनी आयुष्यात विमानाच्या आणि संरक्षणाच्या क्षेत्रात काही काम केले नाही, अशांना हजारो एकर जमीन कशाच्या जिवावर दिली? असा सवाल अरविंद सावंत यांनी उपस्थित केला.

स्वत:ला वकील म्हणवणा-यांनी आरोप करताना नैतिकतेचा विचार करावा असे म्हणत अरविंद सावंत यांनी अप्रत्यक्षपणे आशिष शेलारांना टोला लगावला. नैतिकतेची पातळी सोडून भ्रष्टाचाराचे आरोप सुरू असल्याचं त्यांनी यावेळी म्हटले. इतकेच काय तर ज्यांच्यावर ईडीने कारवाई केली होती, ते सगळे लोक आता भाजपाकडेच आहेत. त्यांच्या केसेसचे काय झाले, असा सवालही अरविंद सावंत यांनी यावेळी उपस्थित केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या