24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयनाणेनिधीने अफगाणशी संबंध तोडले

नाणेनिधीने अफगाणशी संबंध तोडले

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तानशी असलेले संबंध सध्या तोडून टाकले आहेत. जो पर्यंत आंतरराष्ट्रीय समुदायाचे अफगाणिस्तानला मान्यता देण्याबाबतचे चित्र स्पष्ट होत नाही आणि जो पर्यंत या समुदायाकडून अफगाणिस्तानातील तालिबानचे सरकार मान्य केले जाणार नाही तो पर्यंत हे संबंध प्रस्थापित होणार नाहीत, असे नाणेनिधीने म्हटले आहे.

अफगाणिस्तानातील सध्याच्या अत्यंत बिकट स्थितीबाबत आम्हाला तीव्र चिंता आहे. त्याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने मानवतावादी भूमिकेतून काही तरी निर्णय घेणे आवश्­यक आहे, असेही नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राईस यांनी म्हटले आहे. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्ही एखाद्या सरकारला मान्यता द्यायची की नाही याचा निर्णय आंतरराष्ट्रीय समुदायाकडून घेतला जातो.

आम्हाला या समुदयाकडून तशी कोणतीही सूचना अजून आलेली नाही. त्यामुळे आम्ही अफगाणिस्तानबाबतचे सर्वच निर्णय स्थगित ठेवले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पैशांचा वापर करता येणार नाही. गेल्या १५ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या