24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रबिहारमधील सत्तांतराचा फटका, भाजपला बसू शकतो धक्का

बिहारमधील सत्तांतराचा फटका, भाजपला बसू शकतो धक्का

एकमत ऑनलाईन

महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाच्या युतीला बसू शकतो दणका
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडले आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ बिहारमध्ये झालेल्या या सत्तानाट्यानंतर इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मुड ऑफ द नेशन या नावाने एक सर्व्हे केला. या सर्व्हेतून महाराष्ट्रातली धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातून यूपीएला ३० तर एनडीएला फक्त १८ जागा मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये मांडण्यात आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने ४८ पैकी ४२ जागा जिंकल्या होत्या. यातल्या भाजपला २३ आणि शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. या सर्व्हेनुसार आज निवडणुका झाल्या तर भाजपला स्वत:च्या जागाही टिकवता येणार नाहीत. शिंदेंच्या बंडामुळे आता भाजपकडे ४८ पैकी ३७ जागा आहेत.

बिहारमध्ये नितीश कुमारांनी साथ सोडल्यानंतर भाजपच्या २१ जागा कमी होत आहेत. एनडीएला आज निवडणुका घेतल्या तर २८६ आणि यूपीएला १४६ जागा मिळतील. मुड ऑफ द नेशन जाणून घेण्यासाठी इंडिया टुडे सी-व्होटरने १,२२,०१६ जणांची मते जाणून घेतल्याचा दावा केला आहे. फेब्रुवारी २०२२ ते ९ ऑगस्ट २०२२ ही तारीख या सर्व्हेसाठी घेण्यात आली. कारण नितीश कुमार यांनी ९ ऑगस्टला भाजपची साथ सोडली.

मोदींनाच पसंती
या सर्व्हेमध्ये मत नोंदवणा-यांनी मोदींनाच पसंती दिली आहे. ५३ टक्के जणांनी पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे, तर ९ टक्के जणांना राहुल गांधी पुढचे पंतप्रधान वाटत आहेत. केजरीवालांना ६ टक्के, योगी आदित्यनाथ यांना ५ टक्के आणि अमित शाह यांना ३ टक्के जणांनी पसंती दिली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या