Saturday, September 23, 2023

खातेधारकांना बचत खात्यावर मिळणारे व्याज कमी झाले

नवी दिल्ली: देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेच्याग्राहकांना मोठा झटका मिळाला आहे. आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून बँकेच्या कोट्यवधी खातेधारकांना बचत खात्यावर मिळणारे व्याज कमी झाले आहे. पीएनबीने त्यांचे बचत खात्यावरील व्याजदर घटवले आहेत. बँकेने रेपो रेटशी लिंक्ड लेंडिंग रेट मध्ये 0.40 टक्क्यांची कपात केली आहे. यानंतर RLLR 6.65 टक्के करण्यात आला आहे. याआधी RLLR 7.06 टक्के इतका होता.

त्याचप्रमाणे 1 जुलैपासून बँकेतील बचत खात्यावर जास्तीत जास्त 3.25 टक्के वार्षिक व्याज मिळेल. पीएनबीच्या बचत खात्यामध्ये 50 लाख रुपये रक्कम असणाऱ्या ग्राहकांना वार्षिक 3 टक्के तर 50 लाखापेक्षा जास्त रक्कम असणाऱ्या ग्राहकांना वार्षिक 3.25 टक्के व्याज मिळेल. याआधी देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँकेने देखील व्याजदरामध्ये कपात केली होती.

Read More  धक्कादायक : जालना जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून विवाहित तरुणीची गळा चिरून हत्या

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या