22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रप्रकल्प राज्याबाहेर जाण्यामागे अदृश्य शक्ती

प्रकल्प राज्याबाहेर जाण्यामागे अदृश्य शक्ती

एकमत ऑनलाईन

पुणे : टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे. यातच आता आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने संताप व्यक्त होत आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी यामागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचे सूचक विधान केले आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प परराज्यात जात आहेत. पुण्याच्या तळेगाव येथे होणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर टाटाचा एअरबस प्रकल्प जो नागपूरमध्ये होणार होता, तोदेखील गुजरातमधल्या वडोदरा येथे गेला. आज पुन्हा एक प्रकल्प हैदराबाद येथे गेला आहे.

फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन यांचा विमान इंजिन दुरुस्ती आणि देखभालीचा प्रकल्प नागपूर येथे होणार होता. परंतु हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे.

एकामागून एक असे प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आम्ही प्रकल्प आणले, असे सांगून त्यांनी यादी दिली. परंतु ते प्रकल्प कुठल्या काळामध्ये आले, हे पाहिले पाहिजे. जुन्याच प्रकल्पांची यादी देणे हास्यास्पद आहे, असे सुळे म्हणाल्या.

मोठे प्रकल्प राज्याबाहेर जातात, ही गंभीर बाब आहे. पुढच्या वेळेला यापेक्षा मोठा प्रकल्प आणू, असे सांगून लॉलिपॉप दिले जात आहे. तेही प्रकल्प आणा आणि हेही प्रकल्प टिकवा, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

अदृश्य शक्तीबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रकल्प राज्याबाहेर जाणे ही गंभीर बाब आहे. नक्कीच यामागे अदृश्य शक्ती आहे. ती शक्ती नेमकी कोणती आहे, याबाबत माझ्याकडे पुरावे नसल्याने आरोप करणार नाही. परंतु महाराष्ट्रातली गुंतवणूक, नोक-या आणि जीएसटीचे होणारे नुकसान थांबवले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या