20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeराष्ट्रीयआयपीएस अधिका-याने आईला काढले घराबाहेर

आयपीएस अधिका-याने आईला काढले घराबाहेर

एकमत ऑनलाईन

भोपाळ : सोशल मिडियावर बदनामी केल्याने संतापलेले आय. पी. एस. अधिकारी शैलेश सिंग यांनी आपल्या आईलाच घराबाहेर काढले.

काही दिवसांपूर्वी भोपाळमध्ये राहणा-या त्यांच्या मोठ्या भावाने शैलेशहे संपत्तीचा दुरुपयोग करुन ती हडपल्याचा आरोप केला होता.

मुलानेच घराबाहेर काढल्याने हतबल झालेल्या ९० वर्षीय कैलासी सिंग या मातेने व्हिडिओच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली. कैलासी सिंग यांनी या व्हिडिओत आपला मुलगा सतत पैसै मागतो, त्यानं आमच्याकडून पाच लाख रुपये घेतले.

आम्ही जिथे राहतो तिथून तो आम्हाला हकलून लावत असल्याची व्यथाही त्यांनी यातून मांडली. पाहता पाहता त्यांचा हा व्हिडिओ देखील आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून आयपीएस अधिका-यांवर नेटक-यांनी संताप व्यक्त केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या