Saturday, September 23, 2023

स्थलांतरित मजुरांचा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने हाताळता आला असता!

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
लॉकडाउनमुळे देशभरातील स्थलांतरित मजुरांना खूपच हलाखीची परिस्थिती सहन करावी लागत आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर देशभरातील मजुरांनी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पायी चालत आपले घर गाठले असून, अद्यापही अनेक मजूर प्रवास करत आहेत. मजुरांसाठी राज्यांमधून श्रमिक ट्रेन सोडल्या जात असल्या तरी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या मजुरांची संख्या अधिक आहे. स्थलांतरित मजुरांचा हा प्रश्न अजून खूप चांगल्या पद्दतीने राज्य आणि केंद्र सरकारला हाताळता आला असता, असे नीती आयोगाने सीईओ अमिताभ कांत यांनी म्हटले आहे.

लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर अनेक मजुरांच्या हातचे काम गेले असून, उपासमारीची वेळ आली आहे. हातावर पोट असल्याने आपल्या घरी जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय त्यांच्यासमोर नाही. अमिताभ कांत यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं आहे की, लॉकडाउनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत झाली असली तर स्थलांतरित मजुरांचा मुद्दा खूपच वाईट पद्धतीने हाताळण्यात आला.

Read More  ज्येष्ठ शास्त्रीय गायिका श्यामला भावे कालवश

स्थलांतरित मजुरांची सर्व काळजी घेण्याची जबाबदारी राज्य सरकारांची होती. भारतासारख्या मोठ्या देशात केंद्र सरकारची भूमिका मर्यादित असते. हा एक असा मुद्दा आहे जिथे आपण खूप काही करु शकत होतो. राज्यात, जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या प्रत्येक मजुराची आपण खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेता आली असती, असे अमिताभ कांत यांनी सांगितले आहे़ गेल्या कित्येक वर्षांपासून स्थलांतरित मजूर हे आपल्यासमोर खूप मोठे आव्हान असल्याचे समजून घेतले पाहिजे. आपण असे कायदे निर्माण केले आहेत ज्यामुळे अनेक अनौपचारिक कामगार अर्थव्यवस्थेत समाविष्ट आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या