25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयऍसिड हल्ल्यातील पीडितेवरील सर्व खर्च कर्नाटक सरकार करणार

ऍसिड हल्ल्यातील पीडितेवरील सर्व खर्च कर्नाटक सरकार करणार

एकमत ऑनलाईन

बंगळुरु : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीवर ऍसिड हल्ला केल्याची घटना गुरुवार दि. २८ एप्रिल रोजी घडली आहे. घटनेत तरुणी गंभीररित्या जखमी झाली असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपाचार केले जात आहे. ती ३५ टक्के भाजली आहे. ही घटना घडल्यानंतर कर्नाटकचे आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी रुग्णालयात जाऊन पीडित तरुणीची भेट घेतली. तसेच तिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

ऍसिड हल्ला झालेल्या तरुणीच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करेल आणि हा विकृत प्रकार करणा-या गुन्हेगाराला कठोर शासन केले जाईल. राज्य सरकार पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे. तिच्या उपचाराची सर्व काळजी सरकारकडून घेण्यात येईल, असे सुधाकर यांनी सांगितले.

ऍसिड हल्ला करणा-या तरुणाचे नाव नागेश असून तो बंगळुरू येथील रहिवासी आहे. अलीकडेच त्याने पीडित तरुणीकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली होती. पण पीडितेने त्याला नकार दिला. यातूनच त्याने २८ एप्रिल रोजी तिच्यावर ऍसिड हल्ला केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या