19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयभारत-पाक सिमेवर सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकला

भारत-पाक सिमेवर सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : १५ जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिन फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. भारताचा ७४ वा लष्कर दिन यंदा साजरा होत आहे. नवी दिल्ली आणि सर्व लष्करी मुख्यालयात १५ जानेवारी रोजी लष्करी परेड, लष्करी प्रदर्शन आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जाते.

सीमेचे रक्षण करणा-या आणि भारताचा अभिमान वाढवणा-या सैनिकांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. हा दिवस वेगवेगळ्या पध्दतीने सादरा केला जातो. या दिवसात खादीला ही तितकेच महत्त्व असते. राजस्थानातील जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर खादीपासून बनवलेला जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यात आला. हा ध्वज २२५ फूट लांब आणि १५० फूट रुंद आहे.

भारतीय सैन्याची स्थापना केव्हा झाली?
राजे महाराजांच्या कारकिर्दीत प्रत्येक राज्यकर्त्याचे स्वत:चे सैनिक होते. परंतु ईस्ट इंडिया कंपनीने १९७६ साली कोलकत्ता येथे भारतीय सैन्याची स्थापना केली. त्यावेळी भारतीय लष्कर ही ईस्ट इंडिया कंपनीची एक तुकडी होती. ज्याला नंतर ब्रिटिश इंडियन आर्मी असे नाव मिळाले. पुढे जाऊन सैनिकांना भारतीय सैन्य म्हणून मान्यता मिळाली.

कोण आहेत लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा?
देश स्वतंत्र होण्यापूर्वी लष्कर ब्रिटिश सेनापतीच्या ताब्यात होते. सन १९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही भारतीय लष्कराचे अध्यक्ष ब्रिटिशच होते. १९४९ मध्ये स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर होते. त्यांची जागा भारतीय लेफ्टनंट जनरल केएम करिअप्पा यांनी घेतली. ते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्करी अधिकारी झाले. त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील झालेल्या युद्धात भारतीय सैन्याचे नेतृत्व केले. पुढे करिअप्पाही फील्ड मार्शल बनले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या