मुंबई : राज्यात कोरोना चाचणीसाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात, अशा अनेक तक्रारी सरकारकडे दाखल करण्यात आल्या होत्या. यासाठी राज्य सरकारने समिती गठीत केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार, यापुढे राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी 2 हजार 200 रुपये आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन टेस्ट करण्यासाठी आता 2 हजार 800 रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कोरोना चाचण्यांसंदर्भात राज्य सरकारकडून एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला. या अहवालानुसार यापुढे महाराष्ट्रात प्रति व्यक्ती कोरोना चाचणीसाठी 2 हजार 200 रुपये आकारले जाणार आहेत. तसेच एखाद्या रुग्णाची घरी जाऊन जर टेस्ट करायची असेल तर पूर्वी 5 हजार 200 रुपये आकारले जात होते. मात्र आता त्यासाठी फक्त 2 हजार 800 रुपये आकारण्यात येणार आहे, असे राजेश टोपे म्हणाले.
चाचणीसाठी 50 टक्के रक्कम कमी केली
महाराष्ट्रातील कोरोना चाचणीसाठी 50 टक्के रक्कम कमी केली आहे. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्याने खासगी लॅबमध्ये कोरोनासाठी एवढे पैसे कमी केले आहेत. आतापर्यंत 100 लॅब कार्यरत आहेत. विशेष म्हणजे फक्त कोव्हिडसाठी नव्हे तर इतर आजारांच्या टेस्टसाठी ही लॅब वापरता येणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन निर्णय
कोरोना झालेल्या अनेक रुग्णांना पोट बिघडणं, थकवा येणं अशीही लक्षणं दिसून येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे निष्काळजीपणा न करता अशी काही लक्षणे आढळली तर तातडीने डॉक्टरांना दाखवा असा सल्लाही दिला जातोय.
दरम्यान, राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त 2200 रुपये इतका दर आकारला जाणार आहे. तर रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी 2800 रुपये इतका दर निश्चित करण्यात आला आहे. सर्वसामान्य रुग्णांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शुल्क निश्चिती समिती गठीत केली होती
राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती गठीत केली होती. या समितीला आठवडाभराचा कालावधी देण्यात आला होता. निर्धारीत केलेल्या कालावधीत समितीने आपला अहवाल सादर करून सामान्यांना दिलासा दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
यासंदर्भात आरोग्य विभागाने चार सदस्यांची समिती गठीत केली होती. समितीने शासनाला अहवाला सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार दरनिश्चित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
दरवर्षी साथीचे आजारही डोके वर काढत असतात
पावसाला सुरुवात झाली की दरवर्षी साथीचे आजारही डोके वर काढत असतात. सर्दी, खोकला, ताप, हे कॉमन आजार आहेत. त्यात गॅस्ट्रो आणि डेंग्युची साथही येत असते. अशा परिस्थितीत आता कोरोनाही आल्याने जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
मुंबईत 500 आयसीयू बेड लवकरच वाढण्यात येतील
मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. मुंबईत बेड्स कमी आहे, हे आम्हीही मान्य करत आहोत. दररोज 15 ते 20 बेड शिल्लक होतात. सर्व रुग्णालयात आम्ही बेडची संख्या वाढवत आहोत. मुंबईत 500 आयसीयू बेड लवकरच वाढण्यात येतील. राज्यात प्लाझ्मा थेरपी ही 18 मेडिकल हॉस्पिटल आणि 4 महापालिका हॉस्पिटलमध्ये करत आहोत, अशीही माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे कॅबिनेट बैठकीला उपस्थित होते. मात्र आम्ही एक मीटर अंतर ठेवून बसलो होतो. खबरदारी म्हणून मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार स्वत: सेल्फ क्वारंटाईन झाले आहेत. तसेच प्रत्येकजण स्वत: ची काळजी घेत आहेत, असेही राजेश टोपे म्हणाले.
Read More सरकारची चिंता वाढली :कोरोनाच्या लक्षणात आणखी दोन नव्या लक्षणांची भर