मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव केल्यामुळे अर्थसंल्पीय अधिवेशन मदतपूर्वी संपवावे लागले होते. आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता राज्याचे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन जूनमध्ये सुरू होणार आहे. मात्र, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहात पावसाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करणार असून हा कालाधी फक्त चार दिवसांचा असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या पावसाळी अधिवेशन कालावधी कमी करण्यासंदर्भात ९ जूनला कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन हे २२ जून पासून सुरू होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेश फक्त चार दिवस सुरू असणार आहे. यानुसार सर्व प्रथम २ दिवस विधानसभा आणि २ दिवस विधान परिषद घेतली जाईल. राज्याचे पावसाळी अधिवेशन अवघे चार दिवसाचे असणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Read More कोरोनामुळे कल्याणच्या डॉन बॉस्को शाळेचं कारागृहात रुपांतर