25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रराज्याचे पावसाळी अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार

राज्याचे पावसाळी अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : १८ जुलैपासून सुरू होणारे महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले होते. आता राज्याचे पावसाळी अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, अधिवेशनाची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं म्हटलं होतं.

महाराष्ट्रात नवं सरकार स्थापण होऊन दीड महिना उलटला तरी अद्याप मंत्रीमंडळ विस्तार न झाल्याने विरोधक टीका करीत आहेत. तसेच अधिवेशन कधी होणार याबाबत ही विचारणा केली जात होती. परंतु पासाळी अधिवेशन १० ते १७ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे दोन दिवसात मंत्री मंडळ विस्तार देखील होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दीड महिन्यापुर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी पक्षात बंडखोरी केल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शपथविधीनंतर सभागृहाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. ज्यामध्ये नवीन सभापतींची निवड आणि नव्या सरकारची बहुमत चाचणी घेण्यात आली होती. यानंतर सभागृहाचे पावसाळी अधिवेशन होणार होते. परंतु जे काही काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या