22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयमंगळवारपर्यंत मान्सून देशात दाखल होणार

मंगळवारपर्यंत मान्सून देशात दाखल होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाला मंगळवार ३१ मेपर्यंत वाट पाहावी लागेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच यंदा मान्सूनच्या दमदार एण्ट्रीची शक्यता कमी आहे, अशी माहिती स्कायमेटने दिली आहे.

श्रीलंकेच्या वेशीवर रेंगाळलेल्या मान्सूनचे अखेर केरळच्या तिरुअनंतपुरम किना-यापासून १०० किमी अंतरावर आगमन झाले आहे. तसेच ३१ मेपर्यंत मान्सून देशात धडकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून केरळच्या दिशेने प्रवास करू शकतो, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. बंगालच्या खाडीत असनी वादळ आल्यानंतर मान्सून सात दिवस आधी म्हणजे १५ मे रोजीच अंदमान-निकोबार येथे दाखल झाला.

खरंतर यंदा मान्सून २७ मेपर्यंतच केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता मान्सूनच्या आगमनाला ३१ मेपर्यंत वाट पाहावी लागेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. यंदा मान्सूनच्या दमदार एण्ट्रीची शक्यता कमी आहे अशी माहिती स्कायमेटने दिली आहे.

महाराष्ट्रात कमी पाऊस कोसळणार?
महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या १० दिवसांमध्ये जास्त पाऊस होणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस पाण्याचे संकट कायम राहणार आहे. कारण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाणीसाठा मर्यादितच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

पुर्वमौसमी पावसाचा नागरिकांना दिलासा
गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विविध ठिकाणी होत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या