आग्रा (उत्तर प्रदेश) : अलाहाबादचं नामांतर प्रयागराज, फैजाबाद बनलं अयोध्या, मुघलसरायचं नाव बदलून दीनदयाल उपाध्याय नगर आणि आता आग्र्याच्या मुघल म्युझियमचं नाव छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केलं जाणार आहे. उत्तर प्रदेशात नामांतराचं राजकारण पुन्हा सुरु झालं आहे. यावेळी योगी आदित्यनाथ सरकारने आग्र्यात बनत असलेल्या मुघल म्युझियमचं नाव बदललं आहे. आता हे म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम नावाने ओळखलं जाईल.
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा विभागातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे तयार होईल, अशी घोषणा त्यांनी केली. नव्या उत्तर प्रदेशात गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीकांना कोणतेही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जय हिंद जय भारत’ असे ट्वीट त्यांनी केले.
आगरा में निर्माणाधीन म्यूजियम को छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जाना जाएगा।
आपके नए उत्तर प्रदेश में गुलामी की मानसिकता के प्रतीक चिन्हों का कोई स्थान नहीं।
हम सबके नायक शिवाजी महाराज हैं।
जय हिन्द, जय भारत।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 14, 2020
दरम्यान, ऐतिहासिक ताजमहालच्या पूर्वेकडील द्वारावर बांधण्यात हे संग्रहालय बांधण्यात येत असून सुमारे दीडशे कोटींचा हा प्रकल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास या संग्रहालयाच्या माध्यमातून जगभर पोहोवण्याचा यूपी सरकारचा उद्देश आहे.
आग्र्यात बनत असलेल्या मुघल म्युझियमला 2015 मध्ये अखिलेश सरकारच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली आहे. पण आता या म्युझियमचं नाव बदलून योगी आदित्यनाथ यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकीकडे त्यांनी हिंदुत्त्वाचं राजकारण आणखी मजबूत केलं आहे, तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव म्युझियमला देऊन शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठा साम्राज्य आणि मुघलकालीन वस्तू-दस्तऐवजांचं प्रदर्शन
यूपी सरकारने या म्युझियमद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचं वैभव संपूर्ण जगभरात पोहोचवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारने पर्यटन विभागाच्या अधिकारिऱ्याच्या माध्यमातून म्युझियममध्ये मराठा साम्राज्याच्या तमाम वस्तू प्रदर्शनाला ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच आग्र्यात बनणाऱ्या या म्युझियममध्ये मुघलकालीन वस्तु आणि दस्तऐवज प्रदर्शित केले जातील, अशी माहिती पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय पर्यटकांसाठी इथे विशेष सुविधांची व्यवस्था करण्यासही सांगितलं आहे.
‘प्रत्येकाला लस’ यासाठी २०२४ उजाडणार!