24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeक्राइमम्हैसाळमधील ९ जणांच्या हत्याकांडाचा उलगडा होणार

म्हैसाळमधील ९ जणांच्या हत्याकांडाचा उलगडा होणार

एकमत ऑनलाईन

मिरज : मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये २० जून रोजी घडलेल्या वनमोरे कुटुंबातील हत्याकांडाचा संपूर्ण उलगडा आज होणार आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया या हत्याकांडाचा संपूर्ण उलगडा आज सायंकाळी पाच वाजता सांगलीत पत्रकार परिषदेत करणार आहेत.

यामुळे मागील दह दिवसापासून राज्यभर गाजलेल्या या हत्याकांडाच्या मागच्या अनेक बाबी आज स्पष्ट होणार आहेत. दरम्यान या हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी मांत्रिक अब्बास मोहंमदअली बागवान याच्या सोलापूर येथील घराची झडती घेत पोलिसांनी तंत्र-मंत्रासाठी वापरण्यात येणारे काही साहित्य जप्त केल्याची माहिती आहे.

दोन सख्खा भावाच्या कुटुंबातील एकूण ९ जणांचे एकावेळी सापडलेले मृतदेह, यापैकी दोन मृतदेहाच्या खिशात सापडलेली अन् एकाच हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी, चिठ्ठीत पैसे घेतलेल्याची नावे आणि त्यानंतर पोलिसांनी चिठ्ठीतील नावाप्रमाणे जवळपास २५ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दाखल केलेला गुन्हा, १८ लोकांना अटक आणि शेवटी या ९ जणांच्या आत्महत्या नसून हत्या असल्याचा पोलिसांचा खुलासा…

अशा नाट्यमय कलाटणी मिळालेल्या आणि सांगली जिल्ह्यातील आतापर्यंत सर्वांत मोठे हत्याकांड ठरलेल्या म्हैसाळमधील घटनेचा उलगडा करण्यात सांगली पोलिसांना १२ दिवसांत यश आले. आता या हत्याकांडाचा नेमका घटनाक्रम, चिठ्ठी मागचे गुपित, वनमोरे कुटुंबाने मांत्रिकाला गुप्तधन शोधून देण्यासाठी नेमकी किती रक्कम दिली होती, यासह घटनेमागच्या अनेक प्रश्नांची उत्तरे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आजच्या पत्रकार परिषदेत मिळणार आहेत.

गुप्तधनाची आशा दाखवत मांत्रिकांनी वनमोरे कुटुंबाला आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. यानंतर १९ जून रोजी रात्री काळ्या चहामधून विषारी द्रव्य देऊन वनमोरे कुटुंबातील नऊ जणांचे हत्याकांड घडवले. मांत्रिक बागवान याच्या सोलापुरातील बाशा पेठ येथे तो राहात असलेल्या घराची झडती घेण्यात आली. या मांत्रिकाच्या अटकेनंतर त्याचे कुटुंबीय घराला कुलूप लावून गायब झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या