28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeनांदेडबोथडीत तरुणाचा खून, मारेक-याचाही पाडला मुडदा

बोथडीत तरुणाचा खून, मारेक-याचाही पाडला मुडदा

एकमत ऑनलाईन

किनवट : सलून दुकानात दाढी, कटिंग करण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा चक्क दुकानदाराने चाकुने भोसकून खून केला. यानंतर संतप्त जमावातील अज्ञात लोकांनी त्या दुकानदारास बेदम मारहाण करून त्याचाही खून करून दुकान व घर पेटवून दिले. ही भयंकर घटना बोधडी (बु ) येथे दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाच ते साडे सहाच्या दरम्यान घडली. केवळ एका तासात दोन खुनाचे तांडव आणि जाळपोळीची घटना घडल्याने तालुक्यात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बोधडी (बु) येथील बाजारपेठेतील अनिल मारोती शिंदे वय अंदाजे ४० वर्षे यांचे सलूनचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात व्यंकटी सुरेश देवकर वय अंदाजे २२ वर्षे हा युवक दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान कटिंग करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याच्यासोबत दुकानात काहीतरी कारणावरून बाचाबाची झाली. यांनतर अनिल शिंदे याने व्यंकटीवर चाकूने वार करून खून केला. अवघ्या काही मिनीटातच ही बातमी वा-यासारखी संपुर्ण बोधडीत पसरली. ही माहीती समजताच कटिंगच्या दुकानाकडे चालून आलेल्या संतप्त जमावातील लोकांनी दुकानदार अनिल शिंदे यास शोधून त्याला बेदम मारहाण केली. यात त्याचाही मृत्यू झाला. त्यानंतर या संतप्त जमावाचा मोर्चा त्यांच्या दुकानाकडे वळला आणि त्याचे दुकान व घर पेटवून दिले. या घटनेत अन्य दोन घरे सुद्धा जळाली अशी माहिती आहे. या घटनेची माहीती किनवट पोलिसांना मिळताच फोैजफाट्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सोबत अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. दोन्ही खुनाचे तांडव व जाळपोळ ही घटना सायंकाळी साडे पाच ते साडे सहाच्या दरम्यान केवळ एका तासातच घडलेल्या घटनेमुळे बोधडीसह संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण पसरले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या