25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडनांदेडमधील बियाणी हत्याप्रकरणाचे गूढ उलगडले

नांदेडमधील बियाणी हत्याप्रकरणाचे गूढ उलगडले

एकमत ऑनलाईन

नांदेड : सहा राज्याचा प्रवास आणि परदेशात चार ठिकाणी पत्र व्यवहार केल्यानंतर प्रसिद्ध बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या हत्याकांडाचा उलगडा झाला आहे़ या प्रकरणात तब्बल ५५ व्या दिवशी सहा आरोपींना गजाआड करण्यात आले आहे़ ही हत्या खंडणी व देण्या घेण्याच्या वादातून झाली आहे़ या प्रकरणाचा तपास पुढे सुध्दा सुरू राहणार आहे.

यात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असून गजाआड केलेल्या आरोपींची न्यायालयाने दहा दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे, अशी माहिती नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड जिल्ह्यासह संपुर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणारी हत्याकांडाची घटना दि. ५ एप्रिल २०२२ रोजी शहरातील गीतानगर भागात घडली होती़ प्रसिद्ध बांधकाम व्यवसायीक संजय बालाप्रसाद बियाणी वय ५१ यांची सकाळी दहाच्या सुमारास दोन बंदुकधारी मारेक-यांनी दहा गोळ्या झाडून हत्या केली होती.

या प्रकरणी अनिता संजय बियाणी यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीसांनी कलम ३०२, ३०७, ३४ आणि ३/२५ हत्यार कायदा असा गुन्हा दाखल केला़ घटना गंभीर असल्याने पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शंनाखाली या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. तपासासाठी सहा राज्याचा प्रवास करावा करून परदेशात चार ठिकाणी पत्र व्यवहार करावा लागला़ यानंतर संजय बियाणी यांच्या हत्याकांडाचा उलगडा झाला़ तब्बल ५५ व्या दिवशी दि. ३१ मे रोजी इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरथसिंघ मेजर वय (३५) रा.चिखलवाडी कॉर्नर नांदेड, मुक्तेश्र्वर उर्फ गोलू विजय मंगनाळे (२५) रा.नाईकनगर नांदेड, सतनामसिंघ उर्फ सत्ता दलबिरसिंघ शेरगिल (२८), रा.शहीदपुरा नांदेड,

हरदिपसिंघ उर्फ सोनू पिनीपाणा सतनामसिंघ बाजवा (३५) रा.अबचलनगर रोड नांदेड, गुरमुखसिंघ उर्फ गुरी सेवासिंघ गिल (२४) रा.शहीदपुरा नांदेड व करणजितसिंघ रघबिरसिंघ शाहु (३०) रा.बडपुरा नांदेड या सहा अटक करण्यात आली. दि.१ जून रोजी पाचव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी.एम.देशमुख यांच्या समक्ष आरोपींना हजर करण्यात आले़ तेव्हा न्यायालयाने तपासासाठी आरोपींना दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविले, अशी माहिती बुधवारी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी

यांनी घेतलेल्या पत्रकार दिली़ पुढे बोलतांना तांबोळी म्हणाले की, बियाणी हत्याकांडातील सर्व माहिती अत्यंत संवेदनशिल आहे. या प्रकरणात अनेक आरोपींचा सहभाग आहे़ हे हत्याकांड कट रचुनच झाले, हे सिध्द झाल्यानंतर याप्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम १२० (ब) आम्ही वाढवले आहे. पुढच्या एका आठवडयात इजर आरोपींना गजाआड करू असे स्पष्ट केले़

हत्याकांडाच्या तपासासाठी पोलीस दलाचे प्रमुख प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक तथा एसआयटी पथक प्रमुख विजय कबाडे, निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, संतोष तांबे, संतोष शेकडे, पांडूरंग माने, शिवसांब घेवारे, चंद्रकांत पवार, पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे, गंगाप्रसाद दळवी, सचिन सोनवणे, आशिष बोराटे, दत्तात्रय काळे, गणेश गोटके यांच्यासह ४० अधिका-यांनी आणि ६० पोलीस अंमलदारांचा फौजफाटा कामाला लागला होता़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या