33.6 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeमहाराष्ट्रनाशकात राष्ट्रवादीला खिंडार

नाशकात राष्ट्रवादीला खिंडार

एकमत ऑनलाईन

माजी नगराध्यक्ष, नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
नाशिक : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. बरेच नेते सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत अशातच ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादीला नाशिकमध्ये खिंडार पडण्याची शक्यता आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नाशिकमध्ये येऊन गेल्यानंतर ब-याच घडामोडी घडताना दिसत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे जवळचे सहकारी आणि माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मोरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यानंतर या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

माजी नगराध्यक्ष सुनील मोरे हे छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय आहेत. नाशिकच्या सटाणा येथील शहर विकास आघाडीचे मोरे हे संस्थापक आहेत. त्याचबरोबर ते सटाण्याचे माजी नगराध्यक्ष देखील आहेत. याशिवाय छगन भुजबळ चालवत असलेल्या समता परिषदेचे ते माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सटाणा दौ-यावेळी मोरे यांनी बावनकुळे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

सुनील मोरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नाशिक ग्रामीणमध्ये मोठी ताकद मिळेल. शहर विकास आघाडीचे ११ माजी नगरसेवक आणि शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे मोरेंचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित झाल्याचे मानले जात आहे. फक्त प्रवेशाची तारीख ठरायची बाकी असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासाठी हा मोठा धक्का असणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या